Wednesday, January 30, 2019

सायबर गुन्ह्यांविरुध्दची कलमे !

आपण नेहमीच इंटरनेटचा वापर करणा-यांपैकी आहात.याचा वापर करतांना कळत नकळतपणे आपल्या कडुन नेहमीच चुका होत असतात.त्यामधील काही चुका ह्या राष्ट्र व समाज हितावह नसतात.त्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.या माध्यमातून योग्य सामाजिक संदेश सर्वांपर्यंत पोहचविण्याचे कार्य आपण करायला हवे व योग्य सावधानता बाळगणे गरजेचे आहे.या इलेक्ट्राॅनिक मिडिया गैरवापर होऊ नये.या करिता सायबर क्राईम अंतर्गत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रिय सायबर सुरक्षा धोरण- २०१३ अन्वये अनेक कायदे तयार करण्यात आलेले आहेत.

तर आज आपण या सायबर क्राईमच्या काही महत्त्वाचे (गुन्हे) याविषयीची अधिक माहिती घेऊ.
➖श्री.संतोष भोंबळे शेगाव


* माहितीचे स्वरुप -

गुन्हा, आय.टी.कलमे - पी.आय.पी.सी.कलमे - दंड/शिक्षा - गुन्ह्याचे स्वरुप या पद्धतीने आहे.


१) हॅकिंग/फिशिंग/डेटा चोरी करणे -

४३(A),४३(B),४३(D)६६(C) (Bailable) - ३७९,४०६ (Non Bailable).

तीन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि पाच लाखापर्यंत दंड किंवा दोन्ही अशा शिक्षा होऊ शकतात .

स्वरुप - इतरांची माहिती आर्थिक फायद्यासाठी चोरुन (विनापरवानगीने) उपयोगात आणणे.


२) व्हायरस पसरविणे-

४३(C),४३(E),६६ (Bailable) - ३७९,४०५,४२० (Non Bailable). -

तीन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि पाच लाखापर्यंत दंड किंवा दोन्ही अशा शिक्षा होऊ शकतात.

स्वरुप - एखाद्या मॅसेज द्वारे अथवा इंटरनेटच्या माध्यमातून व्हायरस पसरविणे.


३) ई-मेल द्वारे फसवणुक करणे -

६६(C),६६(D) (Bailable) - ४१५,४२० (Non Bailable) -

तीन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि एक लाखापर्यंत दंड किंवा दोन्ही अशा शिक्षा होऊ शकतात.

स्वरुप - ई-मेलचा गैरवापर करुन फसवणुक करणे.


४) Mental Inconvenience 
(मानसिकदृष्ट्या छळणे किंवा त्रास देणे) -

६६(A) (Bailable) - ५००,५०६,५०७ (Bailable) -

तीन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि एक लाखापर्यंत दंड किंवा दोन्ही अशा शिक्षा होऊ शकतात.

स्वरुप - वारंवार एखाद्याला लक्ष करुन त्याची बदनामी होईल.किंवा त्याची मानसिकता खराब होईल असे संदेश अथवा कमेंट करणे.किंवा हेतुपुरस्सर अपमानित करण्यासारखे शब्द प्रयोग करणे.


५) सायबर आतंकवाद -

६६ (F) - १५३(A)दोन्ही कलमे (Non Bailable) आहेत. -

आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते.

स्वरूप - इंटरनेटचा वापर करुन आतंकवादास प्रोत्साहन होईल.असे संदेश प्रसारित करणे.किंवा त्यास प्रोत्साहन देणे.


६) अश्लीलता प्रक्षेपण -

६७(A)(Bailable)
- २९२,२९३,२९४,५००,५०६ (Non Bailable) -

तीन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि एक लाखापर्यंत दंड किंवा दोन्ही अशा शिक्षा होऊ शकतात.

स्वरूप - अश्लीलता असणारे संदेश प्रसारित करणे.


७) आक्षेपार्ह मजकुर/छायाचित्र प्रक्षेपण -
६६(A) (Bailable) - ५००,५०९(Non Bailable) -

तीन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दोन लाखापर्यंत दंड किंवा दोन्ही अशा शिक्षा होऊ शकतात.

स्वरूप :- सामाजिक किंवा धर्म,जाती,यामध्ये द्वेश निर्माण करणाऱ्या किंवा त्यामुळे कोणत्याही प्रकारे सामाजिक व धार्मिक अशांतता निर्माण होईल असे संदेश अथवा चित्रे प्रदर्शीत करणे.

अजूनही बरीच वेगवेगळी कलमे आहेत.वरिल कलमे व दंड/शिक्षा ,व गुन्ह्याचे स्वरुप हे आपल्या करिता निश्चितच मार्गदर्शक ठरेल.





Previous Post
Next Post

post written by:

This is Premsagar Gavali working as a cyber lawyer in Pune. Mob. 7710932406

0 comments: