Wednesday, April 14, 2021

केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलनं केली 155260 ही हेल्पलाइन सुरू!

 केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलनं 155260 ही हेल्पलाइन सुरू केली आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन फ्रॉडला बळी पडलेले असाल तर तातडीनं या क्रमांकावर संपर्क साधा. पुढच्या ७ ते ८ मिनिटांमध्ये तुमच्या बँक खात्यातून ज्या आयडीवरुन पैसे चोरले गेले आहेत. त्या बँकेच्या किंवा ई-साइटला अलर्ट मेसेज हेल्पलाइन क्रमांकावरुन जाईल. त्यामुळे बँक खात्यातून वजा होणारी रक्कम होल्डवर जाईल आणि तुमचे पैसे वाचू शकतात.

ऑनलाइन फ्रॉडच्या घटनांना रोखण्यासाठी गृह मंत्रालयाच्या सायबर पोर्टल https://cybercrime.gov.in/ आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलसोबत 155260 हा पायलट प्रोजेक्ट गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्यात आला होता. पण आता संपूर्णपणे याची तयारी करुन लॉन्च करण्यात आला आहे. इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशनचं हे असं व्यासपीठ आहे की दिल्ली हे राज्य याचं सर्वप्रथम यूझर बनले आहे. यासोबतच राजस्थानला देखील जोडण्यात आलं आहे. यानंतर हळूहळू सर्व राज्या या प्रोजेक्टशी जोडले जाणार आहेत.
जवळपास ५५ बँका, ई-वॉलेट्स, ई-कॉमर्स साइट्स, पेमेंट गेटवे व इतर संस्थांसोबत मिळून इंटरकनेक्ट प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. ज्याचं नाव 'सिटिजन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग सिस्टम' असं ठेवण्यात आलं आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीनं कमीत कमी वेळेत फ्रॉडला बळी पडलेल्या लोकांची मदत करता येते. या हेल्पलाइनच्या सहाय्यानं आतापर्यंत २१ लोखांच्या ३ लाख १३ हजार रुपये ऑनलाइन फ्रॉड होण्यापासून वाचविण्यात यश आलं आहे.
विशेष म्हणजे, हेल्पलाइनच्या एकूण १० वेगवेगळ्या लाइन्स तयार करण्यात आल्या आहेत. जेणेकरुन हेल्पलाइन कधीची व्यस्त राहणार नाही. हेल्पलाइन नंबर 155260 वर कॉल करताच तुम्हाला तुमचं नाव, नंबर आणि घटना घडल्याची वेळ विचारण्यात येते. प्राथमिक माहिती दिल्यानंतर संबंधित पोर्टल आणि बँक, ई-कॉमर्सच्या डॅशबोर्डला घडलेल्या घटनेची तातडीनं माहिती पोहोचविण्यात येते. यासोबतच फ्रॉडला बळी पडलेल्या व्यक्तीच्या संबंधित बँकेसोबतही घटनेची माहिती दिली जाते. ऑनलाइन फ्रॉड झाल्यापासूनचे पुढचे २ ते ३ तास अतिशय महत्वाचे ठरतात. फ्रॉड झाल्या क्षणाला तुम्हाला तातडीनं तक्रार करणं गरजेचं ठरतं. तुम्ही https://cybercrime.gov.in/ या संकेतस्थळावरही तक्रार दाखल करू शकता. #cybercrime #cybersafety #cybersecurity
Previous Post
Next Post

post written by:

This is Premsagar Gavali working as a cyber lawyer in Pune. Mob. 7710932406

0 comments: